आज जागतिक चिमणी दिनाला डॉ.भरत महाजन यांनी दिले चिमणीला जिवदान ; घरटे बांधून दिले दाणा पाणी

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील . गौ सेवक तसेच पक्षीप्रेमी तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भरत महाजन यांनी आज २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिनी सकाळी एका चिमणीचे प्राण वाचवून खऱ्या अर्थाने समाजाला मानुसकीचे दर्शन घडविले .
आज सकाळी डॉ महाजन हे ड्युटीवर गेले असता त्यांचे हॉस्पिटलमध्ये एक चिमणी जखमी अवस्थेत पडलेली डॉक्टरांना दिसली .यावेळी त्यांनी चिमणीला उचलले व बघितले तेव्हा तिच्या पंखांना इजा झाल्याचे निदर्शनास आले . तिला व्यवस्थित उडता सुद्धा येत नव्हते. यावेळी जखमी चिमणीवर वैद्यकीय उपचार केले . एवढयावरच डॉक्टरांचे समाधान झाले नाही त्यांनी लगेच
तिला राहण्याकरिता एक छोटेसे टूमदार घरटे तयार केले .तसेच चिमणीला खाण्याकरीता धान्याचे दाणे आणि पाण्याची व्यवस्था केली .दरम्यान डॉक्टरांची सर्व लगभग जखमी चिमणी एकटक केविलवाण्या नजरेने पाहत होती
मुके प्राणी पशु पक्षी यांना देखील भावना असून चांगले आणि वाईट ओळखतात त्यांनाही कळतं मित्र आणि शत्रू कोण आहे .
या घटनेवरून सिद्ध झाले. डॉ.भरत महाजन आणि चिमणी ताई यांच्यामध्ये काही क्षणात निर्माण झालेली मैत्री बघून उपस्थित सर्व स्टॉफने डॉ महाजन यांचे कौतुक केले .
आज जागतिक चिमणी दिवस असताना सकाळीच चिऊताईचे दर्शनही झाले आणि सेवाही करायला मिळाली . वैद्यकीय उपचारानंतर प्रकृती ठीक झाल्याने डॉ महाजन यांनी तयार केलेल्या घरट्यामध्ये काही क्षणातच राहायला सुरुवात केली.
उन्हाळ्यात पशुपक्षांची काळजी घ्या; परिसरात वा छतावर पाणी ठेवा ; – डॉ महाजन यांचे आवाहन
उन्हाळा सुरू झालेला आहे आपणही पशुपक्षांकरिता आपल्या घराजवळ , परिसरात , टेरेसवर धान्याचे दाणे, खाण्याच्या वस्तू, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
तसेच गोमाते करिता आपल्या घराजवळ पाण्याची व्यवस्था करावी असे आवाहन डॉ. भरत महाजन यांनी जागतीक चिमणी दिनानिमित्त नागरिकांना केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *