भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता 22 मार्च रोजी असलेल्या जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर जनतेने घरात राहावे , विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून हा बंद पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे .
या अनुषंगाने शहरातील बाजारपेठ पोलिस ठाणे पासून निघालेले पथकात उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने , उप विभागीय पोलिस अधिक्षक गजानन राठोड , पोलिस निरीक्षक दिलीप भागवत , बाबासाहेब ठोंबे,रामकृष्ण कुंभार व पोलिस सर्व टिम ने आज शनिवार २१ रोजी संध्याकाळी संपूर्ण भुसावळ शहरात जनतेला बंद ठेवण्याचे आवाहन करीत आहेत .




