भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील ५५ वर्षीय महिलेस लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सुनील रामकिसन मोहासे (५५, रा.रेल्वे फिल्टर हाऊसजवळ, भुसावळ) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी संशयीत मोहासे याला बुधवारी पोलिसांनी अटक केल्यानंतर गुरूवार रोजी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत रवानगी केली
आरोपीने पीडीतेवर जून २०१४ पासून लग्नाचे आमिष देत महिलेवर साडेचार वर्षापासून अत्याचार चालवला होता. आरोपी या महिलेशी विवाह न करता अन्य महिलेशी विवाह करीत असल्याने त्याने पीडीतेस मारहाण, शिवीगाळ करीत घरातून हाकलून दिले तसेच फिर्यादी महिलेने मोहासे यास खर्चाला दिलेले २५ हजार रुपये सुध्दा परत दिले नाही. याप्रकरणी महिलेने बुधवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात सुनील मोहासे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी.बी. ठोंबे पुढील तपास करीत आहे.



