भुसावळ (प्रतिनिधी ) –
रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी पोरबंदर संत्रगाची कविगुरु एक्सप्रेसला अतिरिक्त १ वातानुकूलित तृतीय श्रेणी अणि १ स्लीपर क्लास कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे.
डाउन पोरबंदर संत्रगाची कविगुरु एक्सप्रेसला दि. २० मार्चपासून तर अप संत्रगाची पोरबंदर कविगुरु एक्सप्रेसला दि. २२ मार्चपासून १ वातानुकूलित तृतीय श्रेणी अणि १ स्लीपर क्लास कोच लावण्यात येईल. बरेली एलटीटीएक्सप्रेसला अतिरिक्त १ वातानुकूलित तृतीय श्रेणी कोच २१ मार्चपासून लावण्याचा निर्णय घेतला आहे. डाउन एलटीटी बरेली एक्सप्रेसला दि.२३.०३.२०२० पासून लावला जाईल.
पूरी ओखा एक्सप्रेस एलएचबी रेकमधे गाडी क्र. १८४०१ अप पूरी ओखा एक्सप्रेसला दि.२२ रोजी गाडी क्र. १८४०२डाउन ओखा पूरी एक्सप्रेसला दि.२५ रोजी एलएचबीकोच मध्ये परिवर्तीत होणार आहे. या गाडीला ९ शयनयान श्रेणी, एक द्वितीय वातानुकूलित श्रेणी, तृतीय वातानुकूलित श्रेणी ४ कोच, ५ सामान्य द्वितीय श्रेणी, २ जनरेटर यान राहील. प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



