बोदवड –
संपुर्ण जगभरात दहशत निर्माण करणार्या कोरोना व्हायरसचा संशयीत रुग्ण बोदवड तालुक्यात आढळल्याने
तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे .
दोन दिवसापूर्वी तालुक्यातील मानमोडी येथील कोरोना सदृश लक्षणे असणारा संशयित
तरुणास जिल्हा रूग्णालयातील विशेष कक्षात 19 मार्च गुरुवार रोजी दाखल करण्यात आले.
हा (२३) वर्षीय तरुण पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे.तो गेल्या दोन- तीन दिवसांपुर्वी आपल्या मानमोडी गावी आला होता.काही लक्षणे जाणवल्यामुळे व बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीबाबत माहिती देण्याचे शासनाचे आवाहन असल्याने गावातील पोलीस पाटील यांनी ही बाब बोदवड तहसिलदार रविंद्र जोगी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून जिल्हा रुग्णालयाच्या टिमने लोणवाडी येथे येत पुढिल योग्य त्या तपासणीसाठी तरुणास जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.या घटनेमुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.उद्या दुपार पर्यंत या तरुणाचा तपासणी अहवाल येणार आहे.
कोरोना विषाणूशी मिळते – जुळते लक्षणे दिसून आल्याने संशयित तरुणास पुढिल तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.वैद्यकीय तपासणी नंतर त्या तरुणास कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे समजणार आहे , अद्याप याबाबतची अधिक
माहिती मिळालेली नसल्याचे तहसिलदार रविंद्र जोगी यांनी सांगितले .



