दिनदयाल नगर भागातील शौचालय व सार्वजनिक नळांची अज्ञात समाज कंटकांकडून तोडफोड ; बाजारपेठ पोलिसात तक्रार

दिनदयाल नगर भागातील शौचालय व सार्वजनिक नळांची अज्ञात समाज कंटकांकडून तोडफोड ; बाजारपेठ पोलिसात तक्रार
भुसावळ ( प्रतिनिधी )-
येथील प्रभाग क्र. २० मधील दिनदयाल नगर भागातील शौचालय व सार्वजनिक नळांची अज्ञात समाज कंटकांकडून तोडफोड करण्यात येऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत नगरसेवक महेंद्र (पिंटु) ठाकूर यांनी कारवाईसाठी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबत नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी बाजार पेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीत,शहरातील प्रभाग क्र.२० मधील लेंडीपुरा व वैतागवाडी भागात पालिकेच्या वतीने शौचालाये बनविण्यात आले आहे.त्यात नळ, पाण्याची टाकी, बेसिन, लाईटची सुविधा पुरविण्यात आली आहे. मात्र काही समाज कंटकांनी लईटची रचोरी केली आहे. बेसीन व संडास शीटची तोडफोड करुन दरवाजे चोरुन नेले आहेत. प्रभागात काही ठिकाणी बोअरिगवरुन नळ कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र समाज कंटक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करित आहे. या समाज कंटकांना स्थानिक पुढारी पाठबळ देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या समाज कंटकांवर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीतून देण्यात आली आहे.
याबाबत पालिका प्रशासन व अधिकारी यांना वारंवार सुचना देऊनही पालिकेने दखल घेतली नसल्याने आपण स्वत: या बाबीकडे लक्ष घालत पोलिसात तक्रार केल्याचे नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी सांगितले. याबाबत बाजारपेठ पोलिसत तपास करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *