भुसावळ (प्रतिनिधी )-
आयआरटीसीएसओचे अध्यक्ष ए.पी.धांडे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे तिकीट तपासणीसांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता,वरिष्ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.शर्मा यांना निवेदन देऊन कोरोनापासून बचावासाठी साधन उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक गुप्ता,वरिष्ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापक शर्मा यांनी आवश्यक साहित्य पुरविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी
डीसीटीआय एच.एस. आलुवालिया,सीटीआय (तपासणी) वाय.डी.पाठक, सीटीआय (डीटीईएल) डी.एम. कापघाते,निसार अहमद खान आयआरटीसीएसओ सचिव निसार अहमद खान, मुख्य कार्याध्यक्ष विव्हियन रॉड्रिग्ज, कोषाध्यक्ष व्ही.के.सचान, विभागीय संघटक दयाराम सिंग, सहसचिव गुड्डू कुमार, अतिरिक्त लेखा परीक्षक संतोष राऊत,संघटन सचिव धिरज कुमार व चेतन गार्ले,कार्यकारीणी सदस्य सी.डी. टाडा,व्ही.टी.मेश्राम,
राष्ट्रीय कार्यकारीणीचे एस.के.दुबे, ए.के.गुप्ता, अरुण कुमार, परमानंद कुमार,युनूस तडवी, बापू पाटील, एस.पी.वाडवी, के.सी.तायडे, दीपक दहतोंडे यांच्यासह तिकीट तपासणीस कर्मचारी उपस्थित होते.



