भुसावळ (प्रतिनिधी )-
विद्युत प्रकल्पातील केमिकल युक्त पाणी भोगावती मार्गे तापी नदी पात्रात सोडल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मुख्य अभियंता यांच्या मार्फत होणाऱ्या या कामांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी प्रदूषण निर्मूलन संयुक्त प्रदूषण निर्मूलन संघर्ष समिती अध्यक्ष तथा भुसावळ शिवसेना विधानसभाक्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे व संघर्ष समिती पीप्रीसेकंम अध्यक्ष रमाकांत चौधरी यांनी केली असून याबाबतीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह संबंधित यांचे कडे तक्रार दाखल केली आहे .
भुसावळ औष्णीक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी पदभार स्वीकारल्या पासून हम करेसो कायदा या प्रमाणे वागत असून प्रदूषण मंडळाने घालून दिलेल्या नियमांची अक्षरशः पायमल्ली केली जात आहे. मनमानी कारभाराने खोटे अहवाल सादर केला व शून्य सांडपाणी विसर्गचा पुरस्कार मिळवून स्वतःची पाठ थोपटवून घेतली आणि आता तेच पाणी बी टी पी एस 210 m व व 2×500 m व चेंबर चोकअप असल्याने रोजचे 400 ते 500 ms सांडपाणी निभोरा नाल्यात सोडले जात आहे. तसेच पूर्व कल्पना देऊनही ऑइल मिश्रीत पाणी भोगावती नदीमध्ये सोडले जात असून ते सांडपाण्या सोबत तापी नदीपात्रातील पाण्याला जाऊन मिळत आहे. हेच पाणी भुसावळ, आयुध निर्माण फॅक्टरी, रेल्वे यांनी बांधलेल्या बंधाऱ्यात गेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नागरीकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल.
माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहिती नुसार प्रकल्प बाधित गावांमध्ये 2×500 m w सुरु होऊन अनेक वर्ष झाले तरी पर्यावरणाच्या नियमानुसार एकही झाड यांनी लावले नाही. विल्हाळे, जडगाव, मन्यारखेडे व पीप्रीसेकंम भोगावती नदी परिसरात कोणत्याही प्रकारे ठोस उपाययोजना अस्तित्वात नाही. मात्र पर्यावरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च केला जातो काम मात्र कुठेच दिसत नाही यातच आता 500 mw प्रकल्पाच्या भिंतीला लागून वाहत असलेली भोगावती नदी पात्रात 6/7 मीटर माती मुरुमांचा भराव टाकून नदी बुजून रस्ता बनविला जात आहे.
पर्यावरण विभागाचे रसायनशास्रद आर एस पारडे यांना पूर्व कल्पना दिली आहे. पर्यावरण संवर्धनाचे नियम व निकष धाब्यावर ठेऊन मुख्य अभियंता पंकज सपाटे यांची मुजोरी दिसून येत आहे. तरी मुख्य अभियंता यांच्या मार्फत होणाऱ्या या कामांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी प्रदूषण निर्मूलन संयुक्त प्रदूषण निर्मूलन संघर्ष समिती अध्यक्ष तथा भुसावळ शिवसेना विधानसभाक्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे व संघर्ष समिती पीप्रीसेकंम अध्यक्ष रमाकांत चौधरी यांनी केली असून याची तक्रार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडे केली असून कार्यवाहीची मागणी केली आहे.



