पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ४० हजार रूपयांचा पहिला हप्ता जमा ; लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी यांचा केला सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत भुसावळ शहरातील लाभार्थ्यांना ४० हजार रूपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा झाल्याने मुख्याधिकारी यांचा लाभार्थ्यांनी सत्कार करून पालिकेचे आभार मानले .
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत भुसावळ शहरातील लाभार्थ्यांना (चालीस हजार ) ४०,०००/- रू पहिला हप्ता मंजूर
भुसावळ शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील ४८ लाभार्थ्यांना नगरपालिका मार्फत बांधकाम परवानगी पत्र देण्यात आले होते त्यापैकी २२ लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू करून ओटा लेव्हल पर्यंतचे काम पूर्ण केल्याने , भुसावळ पालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या सहकार्याने व मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या आदेशानुसार पंतप्रधान आवास योजनेतील लाभर्थ्यांना ४०००० रू पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला .यामुळे सर्व लाभार्थ्यांनी दीपक धांडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी करुणा डहाळे यांचा पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच घरकुल चे लिंटर लेव्हल पर्यंतचे काम पूर्ण झाले असल्याने दुसरा साठ हजार (६०,००० /-) रुपये हफ्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची विनंती करण्यात आली . यावेळी दीपक धांडे यांच्यासह वंदना चौधरी ,अनिल लोखंडे ,शांताराम भोई, अनिल माखिजा ,शेजवळ ,महाले ,यांच्या सह घरकुलाचे लाभार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *