भुसावळात मरीमातेच्या यात्रोत्सवासह बारागाड्या रद्द ; बैठकीत सर्वानुमते घेतला निर्णय ; कोरोनामुळे पहिल्यांदाच पारंपरिक यात्रा रद्द ; नागरिकांचा हिरमोड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून भुसावळ शहरात प्रतिवर्षानुसार व परंपरेनुसार सुरु गुढी पाडव्यानिमित्त जुना सातारा भागात मरीमाता यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून या निमित्त ओढल्या जाणार्‍या बारागाड्यादेखील ओढण्यात येणार नसल्याचा महत्वपूर्ण प्रतिकारात्मक निर्णय मंगळवार रोजी आयोजीत बैठकीत घेण्यात आला.
मरीमाता यात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बैठक घेण्यात आली. शहरात पूर्वपरंपरा असलेली यात्रा आजपावेतो अविरतपणे साजरी होत आली आहे .मात्र पहिल्यांदाच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे यात्रोत्सव रद्द केल्याने भुसावळकरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे .
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे होते. यावेळी जुने सातारा भागातील ग्रामस्थांची उपस्थिती होती. शहरातील हजारों भावीक व भक्त देवीच्या दर्शनास येवून यात्रेत सहभागी होतात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळावी यासाठी सतर्कता म्हणून बारागाड्या व यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .जगत जननी मरीमाता देवीची पूजा भगत व गावकरी विधीवतरित्या करतील, असेही यावेळी बैठकीत ठरले.
बैठकीला नगरसेवक युवराज लोणारी, वसंत पाटील, दीपक धांडे, सतीश सपकाळे, भीमराज कोळी, शेखर इंगळे, नरेंद्र लोखंडे, सागर वाघोदे, भागवत पाटील, चेतन पाटील, विनोद तायडे, पंडित भिरुड, विशाल ठोके, कडू पाटील, रमेश कोळी, चुडामण भोळे, सागर ठोके, देवेंद्र सपकाळे, कुढापा मंडळ सदस्य व जुना सातारा भागातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *