भुसावळ (प्रतिनिधी )-
उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी पाहता सोलापूर तसेच नागपूर दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.यामध्ये
सोलापूर-नागपूर सुपरफास्ट
02111 -02112 सोलापूर-नागपूर-सोलापूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण 14 फेर्या) होणार आहेत. डाऊन 02111 सुपरफास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस 29 मार्च ते 5 जुलै दरम्यान रविवारी सोलापूर येथून रात्री आठ वाजता रवाना होवून दुसर्या दिवशी दिड वाजता नागपूरला पोहोचेल. अप 02112 नागपूर-सोलापूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस 30 मार्च ते 6 जुलै दरम्यान दरविवारी नागपूर येथून तीन वाजता रवाना होवून दुसर्या दिवशी पहाटे 6.15 वाजता सोलापूरला पोहोचेल. या गाडीला कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव व वर्धा रेल्वेे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकूलित टू टियर, दोन वातानुकूलित थ्री टियर, 10 स्लीपर तसेच पाच जनरल डबे जोडण्यात येणार आहेत.

सोलापूर-नागपूर सुपरफास्ट
02113-02114 सोलापूर-नागपूर-सोलापूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसच्या एकूण 14 फेर्या होणार आहेत. डाऊन 02113 सोलापूर सुपरफास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस 26 मार्च ते 2 जुलै दरम्यान दर गुरुवारी एक वाजता सोलापूर येथून रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी पहाटे 05.15 वाजता नागपूरला पोहोचणार आहे. अप 02114 सुपरफास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस 27 मार्च ते 3 जुलैदरम्यान दर शुक्रवारी नागपूर येथून सायंकाळी 7.40 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी दुपारी 1.10 वाजता सोलापूरला पोहोचणार आहे. या गाडीला कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, शेगांव, अकोला, बडनेरा, धामनगाव व वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. आहे. या गाडीला एक वातानुकूलित टू टियर, दोन वातानुकूलित थ्री टियर, 10 स्लीपर तसेच पाच जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. नागपूर-राजकोट सुपरफास्ट
गाडी क्रमांक 01207-01208 नागपूर-राजकोट- नागपुर सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेसच्या एकूण 14 फेर्या होणार आहेत. अप 01207 ी नागपुू-राजकोट 30 मार्च ते 29 जून दरम्यान धावणार आहे. दर मंगळवारी नागपूर येथून रात्री 7.50 वाजता सुटलयानंतर ती दुसर्या दिवशी मंगळवारी दुपारी 4.30 वाजता राजकोटला पोहोचणार आहे. डाऊन 01208 सुपरफास्ट राजकोट-नागपूर एक्स्प्रेस 31 मार्च ते 30 जून दरम्यान धावणार आहे. राजकोट येथून रात्री 10 वाजता ती सुटल्यनंतर दुसर्या दिवशी बुधवारी रात्री 10.15 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, अमळनेर , नंदुरबार, सुरत, भरूच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, सुरेन्द्र नगर या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


