भुसावळ (प्रतिनिधी )-
दोन महिने उलटूनही दिनदयाल नगर येथील विस्थापितांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात न आल्याने सोमवार 16 रोजी दिनदयाल नगर येथील रहिवाशांनी प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. राष्ट्रीय महामार्ग सहाच्या चौपदरीकरणासाठी प्राधिकरणाने 16 जानेवारी रोजी दिनदयाल नगरातील घरे तोडली आली होती याची आठवण प्रशासनाला करून देण्यात आले.
कोरोनामुळे स्मृती आंदोलन रद्द
कोरोनामुळे दरमहा 16 तारखेला होणारे स्मृती आंदोलन रद्द करण्यात आले.
शहरातील दिनदयाल नगर येथील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करताना विस्थापीत झालेल्या बेघरांना तसेच संस्थांना घरासाठी आणि संस्थेसाठी सरकारी गुरचरण मौजे मिरगव्हाण ता. भुसावळ येथील गट नंबर 95 अ 2/1 ही जागा त्वरीत देवून कस्तुरबा गांधी नगराची उभारणी करावी, भुसावळ नगरपालिकेने 1966 मध्ये आठवडे बाजारासाठी सर्वे नंबर 150 मधील भारत ऑईल मिल रहिवाशांना दिनदयाळ नगरातील विस्थापीत झालेल्यांना सातबारा मिळण्याची प्रकिया सुरू करून अतिक्रमण धारकांना सातबारा मिळावा, महानिर्मितीच्या सामाजिक दायीत्व निधीतून वेल्हाळे गावाला 50 टक्के निधी तसेच 80 टक्के स्थानिकांना रोजगार मिळावा, वेल्हाळे गावाचा सामुहिक वनहक्काचा दावा मंजूर करावा, प्रदूषण थांबवावे आदी मागण्यांसाठी सर्वोदय मंडळाने सोमवारी प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. सर्वोद्य मंडळाने दर महिन्याच्या 16 तारखेला घर बनाओ, घर बचाओ आंदोलन सुरु केल आहे. मात्र सोमवारी कोरोना संसंर्ग आजाराच्या पार्श्वभुमीवर हे आंदोलन रद्द करुन काही निवडक आंदोलकांनी न्याय्य मागण्यांचे प्रशासनाला निवेदन देवून लक्ष वेधले. यावेळी चंद्रकांत चौधरी, राजकुमार ठाकूर, किरण मिस्तरी, विजय पाटील, सतीश पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
दिनदयाल नगर येथील विस्थापितांचे प्रांतांना निवेदन; कोरोनामुळे स्मृती आंदोलन रद्द

