भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात औरंगाबाद येथील समर्थ नगरातील शिवाजी सिताराम पौळकर हा युवक रात्रगस्तीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे ड्युटी संपल्याने पोलीस ठाण्यात आले.
यावेळी हा युवक सपोनि.संदीप परदेशी यांना भेटला व माझा मोबाईल हा बस स्टॅन्ड येथे मी मुंबई वरुन घरी औरंगाबाद जाण्यासाठी आलो असता अचानक कुठे तरी पडुन हरवला आहे असे सांगितले. सपोनि.परदेशी,पो हे काॅ.शंकर पाटील,पोना.रविद्र बि-हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील,पोकाॅ.विकास सातदिवे, श्रीकृष्णा देशमुख, दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी व किशोर मोरे हे बस स्थानक परिसरात मोबाईलचा शोध घेण्यासाठी युवकास घेऊन रवाना झाले.सदर भागात मोबाईलचा शोध घेत असता काही तासात मोबाईल रेल्वे स्थानक पोलिस चौकी शेजारील दुध विक्रेते भुरा भाई यांना तो सदर मोबाईल हॅन्डसेट रेल्वे स्टेशन परीसरात सापडला व त्यांनी सदर मोबाईल पोकाॅ.दिनेश कापडणे व प्रशांत परदेशी यांना दिला. पोलीसांनी पोलीस ठाण्यात बोलवून सदर युवकास मोबाईल परत दिला.या युवकाने पोलीस अधिकारी,कर्मचारी व दुध विक्रेत्याचे आभार मानले.



