भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील प्रभाग २८ मधील पाण्याकरिता वारंवार त्रासलेल्या नागरिकांनी शुक्रवारी पालिकेवर नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिचे गटनेते
दुर्गेश ठाकुर यांनी प्रभागातील महिलांसह नागरिकांचा मोर्चा पालिका कार्यालयावर नेला. दरम्यान मुख्याधिकारी सौ करुणा डहाळे यांचेशी चर्चा करण्यात आली .
नगरसेवक दुर्गेश ठाकुर यांनी याआधी येथील नागरिकांना भेड़सावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत अनेकदा पालिकेला निवेदन दिले एवढेच नव्हे तर आंदोलने केली. मात्र पालीका
प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही .या प्रभागात वारंवार उद्भवणाऱ्या पाणी समस्यां बाबत मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना निवेदन देण्यात आले ,चर्चे दरम्यान मुख्याधिकारी यांनी समस्या सोडविन्याचे आश्वासन दीले .
येत्या १५ मार्च पर्यत पाण्याची समस्या न सूटल्यास ३० मार्च रोजी शहरातील नाहाटा चौफुली नजिकच्या पाण्याच्या टाकी खाली बसून करणार आंदोलन इशारा यावेळी संतप्त नगरसेवक दुर्गेश ठाकुर व महिलांनी दिला .



