भुसावळात महाप्रबंधक यांचे जंगी स्वागत ; उत्कृष्ट नाटिकेस 10 हजाराचे पारितोषिक जाहिर

भुसावळ (प्रतिनिधी )- आंतर राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रेल्वे महिलांतर्फे आयोजित कार्यक्रमास मध्य रेल्वे महाप्रबंधक संजीव मित्तल आज भुसावळ येथे उपस्थित असून महाप्रबंधक यांच्या हस्ते रेल्वे स्टेशन वर ६ मार्च रोजी प्रस्तुत पथनाट्याचे उद्घाटन करण्यात आले .
रेल्वे कर्मचाऱ्यांनी “महिला सबलीकरण” या विषयावर पथनाट्य सादर केले. ज्या मध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यात अगदी जन्मा पासूनच कसा भेद भाव केला जातो हे अतिशय उत्तमरित्या व प्रभावीपणे सादर केले. दरम्यान एन डी गांगुर्डे सिनि डी पी ओ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
पथ नाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन सतीश कुलकर्णी यांनी केले तर या नाटिकेत दिपाली मगर, सोनल फेगडे, भावना झा, भारती खंडारे, दिपाली मोरे, सायली शुक्ल, सोनल डॅनियल आणि सतीश कुळकर्णी आदी कलाकार सहभागी होते .
या नाटिकेच्या उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यां संपूर्ण समुहाचे विशेष कौतुक महाप्रबंधक
संजीव मित्तल यांनी केले व नाटीकेस दहा हजार रुपयाचे पारितोषिक घोषित केले.
भुसावळात रेल्वे सरव्यवस्थापकांनी केली पीओएच कारखान्याची पाहणी
मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल यांचे शुक्रवार ६ रोजी पहाटे भुसावळात आगमन झाल्यानंतर त्यांच्या दौ-याला सकाळी 10 वाजेपासून सुरुवात झाली. तसेच महाव्यवस्थापक रेल्वे विद्युत इंजीन कारखान्याचे (पीओएच) तसेच वर्कशॉपचे निरीक्षण केले. यावेळी महाप्रबंधक संजीव मित्तल यांचे सोबत प्रधान मुख्य विधुत अभियंता अतुल पाठक , प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी ए .के .सिन्हा , प्रधान मुख्य सरक्षा अभियंता एस पी वावरे और मध्य रेल्वे चे सर्व प्रमुख अधिकारी , मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता , आणि अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा ,यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, दुपारी तीन वाजता मित्तल हे मालगाडीचे परीक्षण व केंद्राचे निरीक्षण , रेल्वेच्या झेडटीएसला भेट देऊन पाहणी, सायंकाळी 5.45 वाजता नवीन पादचारी पूलाचे आरओएच डेपोजवळ उद्घाटनही महाप्रबंधक यांचे हस्ते करतील.
महाप्रबंधक संजीव मित्तल यांचे सोबत प्रधान मुख्य विधुत अभियंता अतुल पाठक , प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी ए .के .सिन्हा , प्रधान मुख्य सरक्षा अभियंता एस पी वावरे और मध्य रेल्वे चे सर्व प्रमुख अधिकारी , मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता , आणि अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा , कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *