भुसावळ दी. ७ (प्रतिनिधी )-
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत कार्यशाळेचे आयोजन दि. ७ मार्च २०२० रोजी महाविद्यालयातील ए–३६ (कॉन्फरन्स हॉल) मध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेत सकाळी १० वाजता उद्घाटनानंतर सकाळी ११ ते १२ दरम्यान समाधान महाजन (सहाय्यक विक्रीकर आयुक्त जळगाव) व दुपारी १२ ते १ दरम्यान डॉ. जितेंद्र बाविस्कर (विक्रीकर निरीक्षक जळगाव), दुपारी १ ते २ दरम्यान भूषण मोरे ( आर. टी. ओ. अधिकारी जळगाव) यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयांवर व्याख्यान होणार आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे या असतील. तर प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे यांची राहील. ही कार्यशाळा महाविद्यालयातील तसेच परिसरातील महाविद्यालयांमधील सर्व विद्याशाखेतील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. आर. आर. पाटील यांनी केलेले आहे. आणि या कार्यशाळेसाठी प्रवेश मोफत आहे याची नोंद घ्यावी.
या कार्यशाळेसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समिती सदस्य प्रा. डॉ. ममता पाटील, प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर, प्रा. प्रफुल्ल इंगोले, प्रा. मनोज जाधव, प्रा. चंद्रकांत सरोदे, प्रा. पुरुषोत्तम महाजन हे परिश्रम घेत आहे.



