राष्ट्रीय पक्षी मोराला दिले जीवनदान

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील खडका गावाकडे रस्त्याच्या कडेला मोराच्या मागे श्वान लागल्याने त्यांच्या तावडीतून शेख समीर शेख नवाब यांनी मोराला वाचवून जीवनदान दिल्याची घटना येथे घडली . गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 11वाजेच्या दरम्यान खडका गावाकडील न्यू ईदगा कॉलनी जवळील बागवान हॉलच्या शेजारी रस्त्याच्या कडेला एका मोराला गावातील श्वान पकडून मारत होते , यावेळी बागवान हॉल जवळील शेख समीर शेख नवाब (वय 40) हे लाईट फिटीगंचे काम करण्यासाठी जात असतांना सदर प्रकार त्यांनी बघितला व राष्ट्रीय पक्षी मोराला वाचवून जीवनदान दिले.
त्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनला मोराला आणून पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना सर्व घटना सांगितली. पो नी भागवत यांनी ठाणे अंमलदार बालक बाऱ्हे यांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन लावून बाजारपेठ पोलीस स्टेशनला बोलविण्याच्या सूचना दिल्या. मोराच्या जखमेवर बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी स्वाती सोळुंखी यांनी हळद लावली.
पोलीस निरीक्षक यांच्या आदेशावरून वन विभागातील पथकातील वनरक्षक विजय भाईदास माळी पोलीस स्टेशनला आले असता सपोनि.संदीप परदेशी,सुभाष साबळे,रवी तायडे,संजय भदाणे,स्वाती सोळुंखी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पक्षी मोराला वनरक्षकांच्या ताब्यात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *