भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे विभागात दर वर्षाप्रमाणे यंदाही दि.५ मार्च रोजी महिला दिवस सप्ताह निमित्त’महीला रन भुसावळ’आयोजन करण्यात आले होते.
महिला रन भुसावळला सकाळी ७-३० वाजता मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय पासून मंडळ रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात आली. सदर रॅली गांधी चौक,हंबर्डीकर चौक मार्गे स्थानकाच्या उत्तर दिशेत समारोप झाला. या रॅलीत भुसावळ रेल्वे विभागात विविध पदांवर कार्यरत महिला सहभागी झाल्या होत्या.या रन मध्ये महिला शक्ती महिला सबळीकरण, महिलांच्या योगदानाबद्दल घोषणा देण्यात आल्या “बेटियोंको पढ़ना है देश को आगे बढ़ना है” त्यामुळे अधिकच उत्साह आणि जोशपूर्ण वातावरण निर्माण झाला होता. सोबतच अप्पर मंडळ रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिंन्हा,वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार,वरिष्ठ मंडळ परिचालन व्यवस्थापक डॉ.स्वप्निल निला, मुख्य वैद्यकिय अधिकारी डाॅ.पी.के.सामंतराय,वरिष्ठ मंडळ यांत्रिक प्रबंधक पी.रामचंद्रन,रेलवे हायस्कूलचे प्राचार्य सतीश कुळकर्णी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
त्याच्यासह रेल्वे कर्मचारी व रेल्वे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मंडळ रेल्वे व्यवस्थापकाच्या प्रांगणात नुक्कड नाटक सादर केला.तर डॉ.अलका नाईक यांनी सर्व महिला कर्मचार्यांना महिला दिवसा संदर्भात मार्गदर्शन केले.




