तरुणीला धमकी दिल्यावरुन भुसावळच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील समता नगर मधील रहिवासी तथा तत्कालिन भाजपाचे नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या खरात यांच्यासह पाच जणांच्या खून प्रकरणातील आरोपी मयूर सुरवाडे यांच्या घराचा पत्ता व मोबाईल क्रमांक दे अन्यथा तुम्हाला जिवंत सोडणार नाही , अशी धमकी दिल्याप्रकरणी खून प्रकरणातील आरोपी मयुरेश सुरवाडे यांची चुलत बहीण राजश्री राजधर सुरवाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यावरून राज उर्फ सनी रवींद्र खरात याचे विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादी राजश्री सुरवाडे या रेल्वे दवाखान्यात जवळून जात असताना त्यांना आरोपी राज खरात यांनी त्यांच्या वडिल , काका व भावाच्या खुनातील आरोपी मयुरेश सुरवाडे यांचा आई व भाऊ रिंकू यांचा पत्ता विचारला. व त्यांचा मोबाईल क्रमांक दे , असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी राजश्री सुरवाडे यांनी माझ्याकडे त्यांचा पत्ता नसल्याचे सांगितले . त्यावेळी राज याने माझ्या वडिलांचा 6 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवसापर्यंत पत्ता व मोबाईल क्रमांक दिला नाही तर बघून घेईल. व शिवीगाळ केली .त्याचप्रमाणे जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून भाग – 6 , गु. र. नं. 44/ 20 भादवि कलम 294 , 504, 506, 427 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *