भुसावळ (प्रतिनिधी)-
प्रतिवर्षा प्रमाणे यंदा देखील मध्य रेल्वे प्रशासनच्या वतीने भुसावळ विभागात महिला दिनानिमित्त दिनांक 1 मार्च ते 10 मार्च दरम्यान सप्ताह साजरा करण्यात येत आहे . या सप्ताहांर्तग़त दिनांक 5 व 6 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . या विभागात जवळपास 1063 महिला रेल्वे कर्मचारी कार्यरत असून या महिला विविध विभागात गार्ड ड्रायव्हर ,ट्रॅक मॅन ,बुकिंग ,लिपिक, टीसी, स्टेशन मास्टर ,कार्यालय अधीक्षक, आदी महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहे . आम्ही सर्व एकसमान या संकल्पनेवर अभियान राबविन्यात येवून महिला दिवस साजरा करण्यात येणार आहे . यानिमित्त भुसावळ विभागात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात दिनांक 5 मार्च रोजी सकाळी “महिला रन ” या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . विभागीय प्रबंधक कार्यालय (डीआरएम कार्यालय ) पासून सकाळी ७.३० वाजता ‘रन’ ला सुरुवात होणार आहे . त्यानंतर पथ नाटय, महिलांचे आजार व त्याबाबत घ्यावयाची काळजी यावर डॉ अलका नाईक यांचे मार्गदर्शन होणार आहे . दिनांक 6 मार्च रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर पथनाट्याचे आयोजन सकाळी 10 वाजता आयोजीत करण्यात आले आहे .
सर्व महिलानी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .



