भुसावळ( प्रतिनिधी) –
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदासह पूर्व वैमनस्याच्या कारणावरून शहरातील अशोक नगर भागातील किरण खरात यांच्यावर सात जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवार २८ रोजी दुपारी तीन वाजता अशोक नगरात घडली. या हल्ल्यात खरात हे गंभीर जखमी झाले असून बाजारपेठ पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध दाखल गुन्हयातील
संशयीत फरार आरोपी सुभाष उर्फ विठ्ठल श्रीराम मोरे, ऋषिकेश सुभाष मोरे, संदीप भीमराव खंडारे,धीरज वसंत खंडारे, विजय शेषराव भालेराव, अजय विजय भालेराव,गोल्या उर्फ (अक्षय) भीमराव खंडारे गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते.
दरम्यान बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना माहिती मिळताच गुन्हे शोध पथकातील पोलिसांना कारवाई करून गुन्ह्यातील पाच आरोपीना दिनांक 3 मार्च रोजी रात्री ताब्यात घेतले या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार असून शोध सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक नवटके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस स.फै. तस्लिम पठाण,पो.हे.काॅ सुनिल जोशी पो.ना. रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर,उमाकांत पाटील,महेश चौधरी,पो.काॅ.विकास सातदिवे कृष्णा देशमुख,समाधान पाटील, ईश्वर भालेराव यांनी केली.



