भुसावळ (प्रतिनिधी )-
46 लाख रुपयांची खंडणी मागुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यावरुन येथील भुरया बारसे सह दोघां विरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हयातील तीघा आरोपिंना वाल्मीक नगर भागातुन पोलिसांनी जेरबंद केले आहे .
याबाबत फिर्यादी भारत मोतीराम गिरणारे रा.भुसावळ यांच्या वडिलांचा नागपुर येथे तीन गुंठ्यांचा प्लॉट आहे. हा प्लॉट फिर्यादीचे वडील यांनी नागपूर येथील प्रसन्ना दत्तात्रेय टोकेकर राहणार नागपुर यांना खरेदी दिला, असून त्याचा व्यवहार पूर्ण झाला आहे. असे असतांना देखील फिर्यादी गिरणारे यांचेकडून पैसे उकळण्याच्या हेतूने आरोपी भुऱ्या बारसे याने फिर्यादी यांना फोन करून आरोपी संजय आवटे यांच्या ऑफिसवर बोलवले. तेथे फिर्यादी आल्यानंतर भु-या बारसे याने व यातील आणखी एका अनोळखी इसमाने फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यास बोलला की “नागपुर की प्लॉटचा विषय अपने पास आया है ऊस लोटके 46 लाख रुपये मुझे अभी चाहिये नही तो तेरे परिवार को छोडूंगा “नही, अशी धमकी दिली त्यानंतर आरोपी संजय आवटे याने देखील फिर्यादीस 46 लाख रुपये आत्ताच्या आत्ता द्यावे लागतील नाहीतर तुझे काय खरे नाही असे म्हणून त्याने धमकी दिली व फिर्यादिस 555 नंबरच्या बोलेरो गाडीमध्ये घालून संजय आवटे यांचे साकरी फाट्यावर असलेल्यां फार्म हाउसवर घेऊन गेले तिथे गेल्यावर या सर्वानी मिळुन मारहाण केली. व फिर्यादीस विहिरीत ढकलून देण्याची धमकी दिली . यावेळी तिथे असलेल्या रशीद नावाचे इसमाने व एका अनोळखी इसमाने फिर्यादीस 46 लाख रुपयांची खंडणी मागुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद भारत गिरणारे यांनी दिल्यावरुन दिनांक २२ रोजी रात्री बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. 60/2020 IPC 365, 384,323,143,147,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात अाला.
दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना या गुन्हयातील आरोपींची गुप्त माहिती मिळाली यावरून आरोपी भु-या मोहन बारसे रा. वाल्मिकी नगर. किशोर उर्फ सुधाकर टोके रा. गांधीनगर ,संजय अावटे यांचे गाडीवरील ड्रायव्हर , अनिल किशोर डागोर रा.वाल्मीक नगर. यां तिघा आरोपीना सापळा रचुन पोलिसांनी वाल्मिक नगर भागातून ताब्यात घेतले .
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके जळगाव जिल्हा व उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. निरीक्षक अनिल मोरे,स.फौजदार तस्लिम पठाण,पो.ना. रमण सुरळकर, उमाकांत पाटील,महेश चौधरी, तुषार पाटील,समाधान पाटील, पो.का. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी अशानी केली आहे .



