अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघाचा राजस्थान दर्शन दौरा

भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील श्री.अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघाचा राजस्थान दर्शन दौरा दि.२१ फेब्रुवारी ते ७ मार्च पर्यंत सुरू झाला आहे. यात मेहंदीपुर बालाजी,जयपुरचे बिरला मंदिर, राम निवास गार्डन,जंतर मंतर, हवा महल,आमिरचा किल्‍ला जयगढ़ किल्‍ला,सालासर बालाजी, देशनोक करणी माता बीकानेर,श्री रामदेवरा जैसलमेर,श्री ओसिया माता जोधपुर येथील उमेद भवन, कुंभलगढ़, रण कुंवर,माउंट आबू, चित्तौड़गढ़,पुष्कर,अजमेर,आगरा आदी ठिकाणी जाऊन दौरा करतील. श्री अष्टभुजा ज्‍येष्ठ नागरिक संघाचे त्‍यात ८७ सदस्य सहभागी असुन ८० वर्षावरील २ सदस्य,७५ ते ८० वयोगटातील २८ व उर्वरित सदस्य ५५ ते ७५ वयाचे आहे.नेतृत्‍व रेल्‍वेचे सेवानिवृत डिसीआय व ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे जी.आर.ठाकूर हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *