भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील दादासाहेब देवीदास नामदेव भोळे महाविद्यालयातील एम.ए.प्रथम वर्गातील हँडबाल खेळाडु महेश शिरतुरे, किरण जोहरे यांनी भारतीय क्रीडा अंतर्गत प्राधिकरण नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थान पटियालाच्या विभागीय साई संस्थान औरंगाबाद येथे दि.२४डिसेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान हँडबॉल या खेळाचे मार्गदर्शकाचे साठीचे प्रशिक्षण पुर्ण केले आहे. याबद्दल
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. पी.फालक यांनी दोघांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा डॉ संजय चौधरी उपस्थित होते
वरील मार्गदर्शक सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केल्याबद्दल क्रीडा समिती सदस्य प्रा.डॉ.आर.एम.सरोदे, प्रा.अनिल सावळे,प्रा.एस.डी. चौधरी,प्रा.डॉ.भारती बेंडाळे तसेच विद्यार्थी व खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.



