भुसावळात शिवजयंती समितीचे गठन ; अध्यक्षपदी सुनील राखूंडे तर सचिवपदी योगेश बागुल

भुसावळ (प्रतिनिधी )-
सालाबाद प्रमाणे यंदाही तिथीनुसार १२ मार्च २०२० रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणाऱ असून याकरीता शनिवार दिनांक २२ रोजी येथील शासकीय विश्राम गृह येथे दुपारी बैठक घेण्यात आली .यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयती अध्यक्षपदी
सुनिल मारूती राखंडे व सचिवपदी योगेश जगन्नाथ बागुल यांची निवड करण्यात आली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज लोणारी तर
प्रमुख पाहुणे म्हणून दिपक धांडे, अल्बर्ट तायडे, राकेश वाकडे, नमा शर्मा, सोनी ठाकुर हे होते. बैठकीला भुसावळ शहरातील शिवप्रेमी व मावळे उपस्थित होते. प्रसंगी तिथी प्रमाणे येणारी शिवजयंती मोठया प्रमाणात व उत्साहात साजरी करण्यात येवून संपूर्ण शहर पताका व तोरणांनी सुशोभित व भगवेमय करण्यात येणार असून भव्य मिरवणुकी निघणार आहे. शहरवासीयांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मानवंदना देण्यासाठी सहकुटुंब हजर रहावे. भुसावळ शहरातील शाळा, महाविद्यालये, विद्यालयामधील विद्याथी,विद्यार्थीनींनी व महिला मंडळीनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावेअसे आवाहन या वेळी समितीच्यावतीने करण्यात आले .
सार्वजनिक व पारंपरीक पध्दतीने भव्य अशी शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याचे उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल राखुंडे यांनी सांगितले .
श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयती कार्यकारीणी
अध्यक्ष : सुनिल मारूती राखुंडे
सचिव योगेश जगन्नाथ बागुल
उपाध्यक्ष: सोनी ठाकुर, अल्बट तायडे, नमा शर्मा, विनायक जाधव , मिलींद कांबळे कापड
उपसचिव : मनोज पवार, विशाल दत्तु कोळी, लखन सोनू भोई, गौरव , सुनिल बढे, अमोल भालेराव
खजिनदार : अनिल पिसोट (पाटील)
सदस्य मेहबूब शेख, तेजस सपकाळे, योगेश महाजन, राज लोणारी, धर्मेश लोणारी, सारंग भोळे, धीरज इंगळे, विशाल कोळी, मनोज राखुंडे, चेतन पवार, निखील सोनवणे, कपिल भोई, मुकेश राखुंडे, तेजस सपकाळे, शुभम बारसे
सल्लागार: युवराजभाऊ लोणारी, पिंटू कोठारी, दिपक धांडे,
प्रदीप देशमुख, राज आवटे, राजू नाटकर, नितीन धांडे यांची नियुक्ति करण्यात आली .नवनिर्वाचित समितीचे स्वागत व सत्कार उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आला .
कार्यक्रमांचे सूत्रसंचलन ,प्रस्ताविक व आभार उमाकांत शर्मा (नमा ) यांनी केले .

अध्यक्ष सुनील राखूंडे
सचिव योगेश बागुल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *