एकलव्यां प्रमाणे एकनिष्ठता व एकाग्रता हे गुण विद्यार्थ्यानी आचारणात आणावे – आनंद ठाकरे साकेगाव ग्रा पं येथे धनुर्धारी एकलव्य जयंती संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )-
साकेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात धनुर्धारी एकलव्य महाराज जयंती शनिवार २२ रोजी साजरी करण्यात आली .
यावेळी सरपंच अनिल पाटील यांचे हस्ते धनुर्धारी एकलव्य महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले . प्रसंगी माजी सरपंच आनंद ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते .
एकनिष्ठ व श्रद्धेचे प्रतीक म्हणून आदर्श असलेले एकलव्य यांनी गुरुवर्य द्रोणचार्य यांच्या मूर्तीला गुरु मानून धनुर्विद्या अवगत केली .व गुरुदक्षिणा म्हणून अंगठा दिला यामुळे एकनिष्ठ व एकाग्रतेचे प्रतीक आदर्श शिष्य म्हणून एकलव्य यांचे उदाहरण समाजापुढे आजही आहे अश्या आदर्श व दानशूर तसेच निपूण धनुर्धारी एकलव्य महाराज यांच्या प्रमाणे एकनिष्ठता व एकाग्रता हे गुण विद्यार्थ्यानी आचारणात आणावे असे आवाहन माजी सरपंच आनंद ठाकरे यांनी यावेळी मनोगता मधून व्यक्त केले .
यावेळी माजी सरपंच आनंद ठाकरे ,माजी सभापती संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य बळीराम सपकाळे, दिगंबर पाटील ,अनंत सोनवणे, यांचेसह समस्त भिल समाज बांधवांची व गावातील मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *