ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड यांची निवड ; जळगाव जिल्हा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
अध्यक्ष डि. व्ही. पाटील आणि राष्ट्रीय महासचिव निलेश भोईर यांच्या आदेशानुसार बुधवार दिनांक १८ रोजी शासकीय विश्रामगृह भुसावळ येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड सर यांच्यामार्फत जळगाव जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
ग्राहक संरक्षण फाऊंडेशनचे कार्य सध्या सोळा राज्यांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष डी.व्ही पाटील साहेब आणि राष्ट्रीय महासचिव निलेश भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार योग्यरीतीने वाटचाल चालू असून मोठ्या उत्साहाने कार्य सुरू आहे.दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यामध्ये नियुक्ती केल्या जातात.परंतु देशात आलेल्या कोरोना या संकटामुळे नियुक्त्या उशिरा करण्यात आल्या. भुसावळ येथे शासकीय विश्रामगृहात प्रदेशाध्यक्ष विनोद गायकवाड सर यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र, पदाचे कार्ड वाटप करून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.आपल्या संस्थेचे ध्येय धोरण विषयी सखोल माहिती दिली,ग्राहक संरक्षण फाउंडेशन या संस्थेला संपूर्ण महाराष्ट्र भर पोहचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आपण सर्व करणार आहोत,त्यावेळी दत्तात्रय महाजन जिल्हाध्यक्ष,विशाल दांडगे जिल्हा उपाध्यक्ष, हीतेश तायडे जिल्हा उपाध्यक्ष,नामदेव राठोड जिल्हा उपाध्यक्ष,राहुल कोल्हे जिल्हा महासचिव,दिनेश कुमार वाघ जिल्हा महासचिव, पराग वारके जिल्हा कोषागार,सुरेश भालेराव संघटक सचिव,अँड.विजय तायडे सल्लागार,अतुल कोळी सचिव, संदीप कोळी सचिव, सुरेश पाटील सचिव, संघरत्न सपकाळे सचिव,सरफराज तडवी सहसचिव,अतुल साळवे सचिव, परमेश्वर पाटील सचिव, भारत सोनवणे, गौतम पवार, नितीन सूर्यवंशी, गजानन माळी या पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल दांडगे आणि प्रास्ताविक दिनेशकुमार वाघ यांनी केले.हितेश तायडे यांनी आभार मानले.या वेळी जळगाव जिल्हा पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *