खडका गावात गोठ्याला आग : सव्वा लाख रुपयांचे नुकसान –


भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील खडका गावात एका गोठ्याला आग लागल्याने सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले. सोमवारी रात्री ही घटना घडली. खडका येथील मंगेश साहेबसिंग पाटील या शेतकर्‍याच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील भागात भरवस्तीत गोठा असून त्यास सोमवारी रात्री अचानक आग लागली. आगीमुळे गोठ्यातील कापसासह ज्वारीचे पोते, मका, तांदुळाच्या गोणी, ठिंबक नळ्या, ढेपचे पोते, गुरांचा चारा यांच्या सह तीन वापरात असलेल्या सायकल मिळून एक लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. गोठ्याच्या शेजारी राहत असलेल्या पराग वाणी यांना आग दिसताच त्यांनी गोठ्या मालकासह गावकर्‍यांना झोपेतून उठवले. भुसावळ पालिकेचा अग्निशमन बंब व ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मंगळवारी सकाळी तलाठी मनिषा गायकवाड यांनी भेट देवून पाहणी केली. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *