भुसावळात किल्ले बनवा स्पर्धा : विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
राष्ट्रवादीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर शहरातील विद्यार्थ्यार्ंसाठी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धकांनी आपण बनवलेल्या किल्याचा फोटो व आपले नाव मोबाईल ८८३०२२३५०९ या व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर १३ नोव्हेंबरपर्यंत पाठवावे, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे. १६ रोजी बक्षीस वितरण समारंभ होणार असून प्रथम विजेत्याला ३१००, द्वितीय विजेत्याला २१०० व तृतीय विजेत्याला ११०० रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *