भुसावळ –
तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे घराच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये खलील हसन गवळी (रा.कन्हाळा) हा गावठी हातभट्टीची दारू गाळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी अचानक छापा टाकत गूळ मोह नवसागर मिश्रित कच्चे रसायनाच्या पाच ड्रममधील एक हजार लीटर रसायन तसेच गावठी हातभट्टीची ९० लिटर तयार दारू मिळून ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक फौजदार सुनील चौधरी, हवालदार विठ्ठल फुसे, गणेश राठोड, विनोद पाटील, विजय सपकाळे यांनी केली.



