विद्युत इंजन कारखाना भुसावळ तर्फ पेन्शन अदालतीचे आयोजन


भुसावळ (प्रतिनिधी )-
विद्युत इंजन कारखाना , कारखाना लेखा अधिकारी कार्यालय आणि वरिष्ठ सामग्री प्रबंधक कार्यालय ,मध्य रेलवे भुसावळ द्वारा सेवा निवृत रेलवे कर्मचारी यांना अंतिम भुगतान न मिळाल्या बाबतच्या प्रश्नावर विचार विमर्श करण्या करता विद्युत इंजन कारखाना, भुसावळ येथे दिनांक 15.12.2020 मंगळवार रोजी सकाळी 10.30 ते 1वाजता पेन्शन अदालत चे आयोजन केले आहे
तरी संबंधित सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज दिनांक 17.11.2020 पर्यंत मुख्य कारखाना प्रबंधक विद्युत इंजन कारखाना,मध्य रेल्वे ,भुसावल यांच्या कार्यालयात तीन प्रति सह पाठवाव्यात .अर्जात खालील बाबीचा उल्लेख असणे आवश्यक आहे .
१) सेवानिवृत्ती कर्मचारीचे नाव आणि पत्ता २)सेवानिवृत्तीच्या वेळी असलेला हुद्दा ३)सेवानिवृत्तीची तारीख आणि सेवानिवृत्ती चे कारण ४) समस्या विषयी संक्षिप्त तपशील ५)बँक चे नाव व खाते क्रमांक ६)अंतिम वेतन आणि वेतनमान ७)पीपीओ क्रमांक ८)टोकन नंबर व पी एफ नंबर ९)पैन व मोबाइल नंबर १०)आधार नंबर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *