भुसावळात युवकाची गळफास घेवून आत्महत्या ;


भुसावळ — गळफास घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शहरातील रेल्वे परीसरातील गोदावरी कॉलनीतील रेल्वेच्या क्वॅार्टरमध्ये बुधवारी रात्री 12.30 वाजता घडली. या याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशाल विठ्ठल पाठक (28) असे मयताचे नाव आहे. .
रेल्ेच्या गोदावरी कॉलनीतील रेल्वे निवासस्थान क्रमांक 632/ सी यामध्ये सुधाकर विठ्ठल पाठक हे राहतात ते बुधवारी दुपारी कर्तव्यावर गेले असताना त्यांचा भाऊ विशाल हा घरीच एकटा असताना त्याने आत्महत्या केली. रात्री सुधाकर हे घरी आले असता त्यांना ही घटना निदर्शनास आली. नागरीकांच्या सहकार्याने विशालचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. शहर पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात हलवला. शहर पोलिस ठाण्यात चेतन राठोड यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय चव्हाण करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *