अट्टल मोटारसायकलचोर आठ दुचाकीसह एलसीबीच्या ताब्यात –


जळगाव –
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकाने गुरुवार दिनांक 5 रोजी अट्टल मोटार सायकल चोरास त्याने चोरी केलेल्या आठ दुचाकींसह ताब्यात घेतले आहे.
पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा येथील रहिवासी अयुब शेख हा शेंदुर्णी व पहुर भागातून चोरलेल्या मोटारसायकलींची विल्हेवाट औरंगाबाद वाळूज परिसरात लावत असल्याची गोपनीय माहिती पथकातील विजय पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला औरंगाबाद वाळूज येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिस पथकाजवळ चोरीचा गुन्हा कबुल केला. त्याच्या ताब्यातून पहुर व शेंदुर्णी भागातील चोरीच्या आठ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तयार केलेल्या पथकातील पोलीस उप निरीक्षक सुधाकर लहारे, सहायक फौजदार अशोक महाजन, विजय शामराव पाटील, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, ईशान तडवी तसेच सहायक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *