अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटावर बंदी आणावी – हिन्दुत्ववादी संघटनानी केली मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
समस्त हिंदूं धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी सिनेअभिनेता अक्षय कुमारच्या आगामी लक्ष्मी चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी येथील हिन्दुत्ववादी संघटनानी केली असून याबाबतीत शुक्रवार ३० ऑक्टोबर रोजी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .
सिनेअभिनेता अक्षय कुमार यांचा आगामी लक्ष्मी चित्रपट हा लक्ष्मी पूजन दिवाळी या मुख्य हिंदू सणाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित होत असून या लक्ष्मी नामक हिंदी चित्रपटातून लक्ष्मी देवीची विटंबना होत असल्याचे प्रकर्षाने उघडकिस आले आहे . संबंधीत चित्रपट प्रदर्शित न होऊ देता सदर चित्रपटावर बंदी आणावी या आशयाचे निवेदन समस्त हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवार ३० रोजी प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे
यावेळी भूषण महाजन , रोहीत महाले, मनोज चौधरी, प्रणव डोलारे प्रणय भागवत, भूषण दोडे, मयुर सावकारे, अविनाश सोनवणे, पंकज भारंबे यांचेसह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *