भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ इनरव्हील क्लब तर्फे शहरातील तुकाराम नगर परीसरात तयार करण्यात येत असलेल्या सार्वजनिक उद्यानाचे (बाग ) भूमिपूजन क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट रजनी सावकारे, पास्ट प्रेसिडेंट मनीषा तायडे, राखी भराडे, क्लब अध्यक्ष शीतल भराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी क्लबतर्फे बगीचा कंपाउंड वॉलकरीता पाचशे किलो स्टील नेट, सिमेंट पोल इत्यादी सामग्री तुकाराम नगरवासीयांना देण्यात आली. या प्रकल्पाची सुरुवात असोसिएशन सीसीसीसी डॉ.रश्मी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली होती.प्रसंगी शीतल भराडे म्हणाल्या की, मोबाईलमुळे लहान मुलांचे लहानपण हरविले असून इनरव्हील तर्फे सार्वजनिक बगीचे तयार करण्यात येणार असून लहान मुलांसाठी उपयुक्त खेळणी या बागेत उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच जेष्ठ नागरिकांना विरंगुळा व गप्पा गोष्टींकरीता कट्टा देखील तयार करण्यात येणार आहे . रजनी सावकारे म्हणाल्या की, इनरव्हील क्लब आणखी भरघोस मदत करून अशा प्रकारच्या बागा तयार करतील यामुळे सर्वत्र हिरवळ पसरेल.
या प्रकल्पाकरीता रजनी सावकारे, नयना टेकवानी, मनीषा तायडे, राखी भराडे, प्रमोद शुक्ला यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शीतल भराडे, रश्मी शर्मा, रजनी सावकारे, मनीषा तायडे, कांचन जोशी, राखी भराडे या सदस्यांची उपस्थिती होती.



