भुसावळ (प्रतिनिधी ) –
आपल्या खान्देशची सांस्कृतिक परंपरा सुरु रहावी या प्रमुख उद्देशाने दर वर्षी नुपूर कथक डान्स अॕकेडमी मधे भुलाबाई ची स्थापना करुन पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे सर्व क्लासेस बंद असल्याने रोज होणारी गाणी , आरती,व प्रसाद होउ शकत नाही.म्हणून आपली , संस्कार व संस्कृती विद्यार्थांमधे रुजावी याउद्देशाने
यावर्षी भुलाबाई साठी शेताची आरास करण्यात आलि आहे. आपली संस्कृती विद्यार्थांमधे रुजावी हा या मागिल प्रमुख उद्देश असतो.कोजागीरी पौर्णिमेला या महोत्सवाचे सांगता होईल.असे नूपुरचे संचालक रमाकांत भालेराव यांनी सांगितले .



