भुसावळात नवरात्री निमित्त बालीकांची दंत तपासणी ; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम

भुसावळात नवरात्री निमित्त बालीकांची दंत तपासणी ; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम
भुसावळ (प्रतिनिधी )
भुसावळात इनर व्हील क्लब तर्फे नवरात्री निमित्त बालीकांचे दंत तपासणी करण्यात आली.
,ही तपासणी समर्थ क्लिनिक
जामनेर रोड येथे डॉ. विद्या सागर भोळे यांनी केली.
मुलींना मौखिक स्वछता योग्य प्रकारे कशी करावी या विषयी डॉ. विद्या भोळे यांनी सोप्या शब्दात माहिती दिली. आपण शरीराच्या इतर अवयवांची काळजी घेतो पण दातांकडे हवे तसे लक्ष, काळजी लहानपणी घेतली नाही तर पुढे अनेक समस्या उदभवू शकतात याबाबत माहिती दिली.
तपासणी करतांना मास्क व इतर सर्व बाबींची काळजी घेण्यात आली.
तपासणी केल्यावर सर्व १५ मुलींना टूथ पेस्ट, ब्रश, सानिटीझर वाटप करण्यात आली. तसेच या मुलींसाठी पुढील तीन महिन्यासाठी गरज पडल्यास मोफत तपासणी केली जाईल. असें आवाहन डॉ. विद्या भोळे यांचेवतीने क्लब प्रेसिडेंट शीतल भराडे यांनी केले.
सदर प्रोजेक्ट च्या प्रायोजक
क्लबच्या जेष्ठ सदस्या शोभा ताई भोळे होत्या.
सदर प्रोजेक्ट साठी क्लबच्या सी सी जयश्री दवे, नूतन सदस्या सिद्धी तिवारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *