भुसावळ तालुका काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक संपन्न ;


भुसावळ (प्रतिनीधी )-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांचे आदेशान्वये,जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड.संदिप भैय्या पाटील यांचे नेतृत्वात तसेच उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक योगेंद्र भैय्या पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता परफेक्ट मोटर ड्रायव्हींग स्कुल,वरणगांव येथे भुसावळ तालुका काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

बैठकीत शेतकरी व कामगार विधेयक विरोधात व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी व कामगार यांच्या सह्यांची मोहिम राबविणेबाबत चर्चा करुन नियोजन करण्यात आले .यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. संदिपभैय्या पाटील,सरचिटणीस अजबराव बापू, उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक योगेंद्रभैय्या पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पकंज पाटील,सरचिटणीस विवेक नरवाडे,सरचिटणीस रहीम कुरेशी,शहर अध्यक्ष अश्पाक काझी,तालुका सचिव ज्ञानेश्वर पाटील,उपाध्यक्ष रवि पाटील,राजु पालिमकर,ईस्माइल गवळी, सुदर्शन जाधव नितीन पाटील दीपक पाटील ,मुस्लिम अन्सारी,मनोज देशमुख ,प्रकाश भैसे, डाँ.तनुजा भोईटे ,महिला काँग्रेस शहर अध्यक्ष मिनाक्षी जावरे,आदीवासी विभागाचे अन्वर तडवी,युवक काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, तसेच मागासवर्गीय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी व आभार तालुका सरचिटणीस विवेक नरवाडे यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *