भुसावळ(प्रतिनिधी )-
रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड व अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची सी बी आय चौकशी होऊन आरोपींना मरेपर्यंत फाशी व्हावी तसेच भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे पाच वर्षाच्या अल्पवयीन मतीमंद मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील राक्षसी प्रवृत्ती च्या नराधम आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन आज सोमवार दिनांक १९ रोजी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने प्रांताधिकारी भुसावळ यांना देण्यात आले.
प्रसंगी करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत,प्रदेश सचिव रणजित राजपूत,प्रशांत ठाकूर,अभिजित पाटील,चंदू चौहान,आनंदा पाटील,संदीप राणा,सोनी ठाकूर,अनिल राजपूत,समाधान महाजन,सागर महाजन,जय चौधरी,महेश महाजन,वैभव महाजन,हितेश महाजन,निलेश पाटील,ज्ञानेश्वर पाटील व असंख्य राजपूत समाज बांधव उपस्थित होते.



