वांजोळ्यातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : आरोपीला अटक ; १९ पर्यन्त पोलिस कोठडी ;


भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील वांजोळा येथे पाच वर्षीय मुकबधीर अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेनंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ३५ वर्षीय संशयीत आरोपीस अटक केली आहे. वांजोळा गावातील नवीन भिल्ल वस्ती परीसरात राहणार्‍या पाच वर्षीय मुकबधीर अल्पवयीन बालिकेवर संशयीत आरोपी मंगल सीताराम भील (३५) याने अत्याचार केला. या घटनेची माहिती कळताच सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात पोलिसांनी घटनेच्या अनुषंगाने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. पीडीत बालिकेला गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. जबाब सहा. पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण तपास करीत आहे .दरम्यान तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आरोपीस त्वरीत अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवस १९ पर्यन्त पोलिस कस्टडीचे आदेश न्यायालयाने दिले आहे जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे व प्रमोद सावकारे यांनी पीडीत बालिकेसह कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर देत मदतीचे आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *