मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या : निलेश गोरे –


भुसावळ (प्रतिनिधी )-
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त वेलनेस फाउंडेशनद्वारे नुकतेच युट्युब लाईव्हचे आयोजन करण्यात आले. मानसिक आरोग्य व वाढत्या मानसिक समस्यांबद्दल सायकॉलॉजीकल काऊन्सलर निलेश गोरे यांनी मार्गदर्शन केले. का वाढतात मानसिक समस्या? का नाही देत आपण स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य? कुठे होतेय चूक? जाणून घ्या मानसिक आरोग्याबद्दल अत्यंत महत्वाची माहिती देत त्यांनी मार्गदर्शन केले. सध्याच्या विविध संकटांमुळे, स्पर्धात्मकतेमुळे तसेच, धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्याने वेगवेगळे मानसिक आजार कसे बळावत आहेत याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले
त्रास वाढल्यास खर्च वाढण्याची भीती
मानसिक समस्यांकडे लोक दुर्लक्ष का करतात याचा उलगडा करत निलेश गोरे म्हणाले की, इतर शारीरीक आजारांमध्ये तत्काळ मृत्यूची आणि असह्य वेदनेची भीती असते व त्रास वाढला तर मोठा खर्च होण्याची भीती असते म्हणून त्याबद्दल त्वरीत पाऊल उचलले जाते मात्र मानसिक आजारात अशी कोणतीही बाब नसल्याने लोक टाळाटाळ करतात व समस्या वाढवत जातात, शिवाय कोरोना किंवा हृदयरोगाप्रमाणे जागरूकता मानसिक आरोग्याकडे नसल्याने देखील समस्या वाढतात म्हणून मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

सर्वांनी एकमेकांना सहाय्य करण्याची गरज
गोरे म्हणाले की, सर्वांनी या क्षेत्रात एक मेकांना साहाय केल्यास मनोरुग्ण, मानसिक आजार तसेच मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक होईल. संकोच न बाळगता लोक मानसिक आजारांवर उपचार करून घेतील, मनःस्वास्थ्य सुधारल्याने लोकांची कार्यक्षमता वाढून उत्पादकता वाढेल आणि वेळीच निदान व उपचार शक्य झाल्याने कित्येक आत्महत्या रोखल्या जाऊ शकतील, अशी व इतर माहिती निलेश गोरे यांनी युट्युब लाईव्हवर दिली

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *