किन्ही येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुक्यातील कीन्ही येथे तालुका पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड घालून अड्डा उद्ध्वस्त करीत एकाविरुद्ध कारवाई केली .
कीन्ही शिवारात नाल्या जवळ सार्वजनिक जागेवर संशयीत आरोपी
रतन काशीनाथ कोळी रा. कीन्ही हा गावठी हातभट्टीची दारू गाळण्याचे गूळ मोह नवसागर मिश्रित द्रव्य कच्चे रसायन ५ ड्रम त्यात ९०० लिटर रसायण व गावठी हातभट्टीची २५ लिटर तयार दारू अंदाजे किंमत ३१२५०/- रु चे मालासह ६ रोजी
मिळुन आल्याने. त्यांचे विरुद्ध प्रोव्ही कायदा अन्वये कलम ६५ फ, ब, क, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार , सपोनि अमोल पवार , पोहेकाँ विठ्ठल फुसे,पोह/अजय माळी, सुनील चौधरी, होमगार्ड अमोल जयकर, जगदीश पाटील यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *