भुसावळ (प्रतिनिधी )-
उपविभागीय अधिकारी कार्यालय भुसावळ
भुसावळ शहरांमध्ये आय पी एस अधिकारी मिळावा किंवा जे अधिकारी नेमले आहे त्यांच्याकडून सक्तीची कारवाई करून घ्यावी म्हणून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे हल्लीच्या काळामध्ये भुसावळ शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे अक्षरशः भुसावळ शहरातील सर्व स्थरातील लोकांना जगणे मुश्किल झाले आहे एकटं दुकट जाण्याची भीती वाटत असून कधी लुटमार होईल कधी छेडखानी होईल किंवा अचानक कधी हाणामारी होऊन कोणाचा खून केला जातो डॉक्टर ,व्यापारी ,कॉन्ट्रॅक्टटर , यासारखे लहान-मोठे ठेकेदार यांना धमक्या देऊन खंडणी वसूल केली जात आहे एवढेच नाही तर पोलिसांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली जाते किंवा गुन्हेगारांवर कारवाई केली तर त्या पोलीस कर्मचाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवले जाते व तुझी नोकरी खाऊन जाईन अशी धमकी दिली जाते मग विचार करा जर पोलीस कर्मचार्यांचे हे हाल असतील तर सामान्य नागरिकांनी कसे जगायचे त्याच महिलावर्ग शाळकरी मुली यांना धमकावले जाते ब्लॅक मेल केले जात आहे हेच नव्हे तर अल्पवयीन लहान मुलांना गुन्हेगारीकडे वळविण्यात येत आहे चाकू तलवारी बंदुकी या वस्तू भुसावळ शहरांमध्ये सापडणं हे सर्वसामान्य बाब झालेली आहे तसेच अक्षरशः लोक भुसावळ शहर सोडून जाण्याच्या तयारीत आहे इतकी भीती शहरवासीयांच्या मनात भरली आहे तरी आपणास नम्र विनंती आहे की आपण आमची व आमच्या परिवाराचे रक्षण करावे व ह्या गुन्हेगारांचा नायनाट करावा भुसावळ शहरात शांतता प्रस्थापित होईल याची हमी द्यावी. तसेच सोशल डिस्टनशीन, सॉनिटीयझर, मास्क,ऑक्सिमीटर, तापमापक यंत्र चा वापर करून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालन करून चार लोक मिळून मोहीम राबविण्यात आली आहे. शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ ,शिव भोजन केंद्राचे संचालक नमा शर्मा ,मिलिंद कापडे ,धिरज वाढोणकर यांनी मिळून स्वाक्षरी मोहीम भुसावळ शहरात राबवली. याबाबत मुख्यमंत्री ,
उपमुख्यमंत्री ,
गृहराज्य मंत्री ,
विभागीय आयुक्त आय जी नासिक, जिल्हा पालकमंत्री
जिल्हाधिकारी ,
जिल्हा पोलीस अधीक्षक यांना प्रत रवाना करण्यात आली आहे .



