शार्ट सर्किटने ओमनी व्हँनला आग ; प्रवासी सुखरूप ;महामार्गावरिल थरार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भुसावळहून जळगावकडे जाणाऱ्या ओमनी व्हॕनला शनिवारी रात्री 11.30 च्यासुमारास शार्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागल्याची घटना घडली . या आगीत ओमनी जळून खाक झाली मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही .
भुसावळ सिंधी कॉलनीतील रहिवासी नितीन गडियारा हे त्यांच्या ओमनी क्रमांक एम एच 19 एई-5577 या व्हॕनने त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना घेऊन जळगाव येथे प्रवासासाठी निघालेले होते. पुढे साकेगाव जवळील वाघूर नदीच्या पुलाजवळील कॕम्पसमोर आल्यानंतर व्हॕनमधून वायर जळाल्याच्या वास येऊ लागला ओमनीची वायरींग जळाल्याने धूर निघाल्याने शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात येताच चालक गडियारा यांनी त्वरीत प्रसंगावधान राखून वाहनातील सर्वांना तात्काळ खाली उतरवले.
अन त्याच क्षणी व्हॕनने अचानक भडका घेतला. यात संपूर्ण व्हॕन पेटली व जळून खाक झाली .यावेळी महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्यांची मदतकार्य करीत केले . दरम्यान घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे बंब आल्याने आग आटोक्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *