भुसावळात सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा रुजू ; शहरातील सर्व पोलिस स्टेशनला धावती भेट ;


भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ पोलिस उप विभागाचे डीवायएसपी गजानन राठोड यांची नवी मुंबई येथे सहायक आयुक्त्तपदी बदली झाल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागी सहायक पोलिस अधिक्षक म्हणून कुमार चिंथा यांची नेमणूक झाली आहे.
आज मंगळवार दि.६ ऑक्टोबर रोजी कुमार चिंथा यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर भुसावळ शहरातील पोलिस स्टेशनला भेटी दिल्या. पोलिस स्टेशन प्रभारी अधिका-यांकडून त्यांनी विविध प्रलंबीत गुन्ह्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालयात तालुका पोलिस ठाण्याचे पो. नी. रामकृष्ण कुंभार,यांनी तसेच बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान पत्रकारासोबत कुमार चिंथा यांनी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की भुसावळ विभागातील अवैद्यधंदे व गुन्हेगारांनी त्वरित अवैद्यधंदे बंद करावे अन्यथा अवैधधंदेवाइक यांना कठोरातील कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला . भुसावळ शहरातील गुन्हेगार व गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणार असेही कुमार चिंथा म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *