शिवपूर कन्हाळयातील अवैध हातभट्टी अड्डा नष्ट ; तालुका पोलीसांची धडक कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )- 

तालुक्यातील शिवपुर कन्हाळा येथे तालुका पोलिसांनी शुक्रवार रोजी गावठी हातभट्टी दारू अड्डयावर धडक कारवाई केली .
या कारवाईमुळे हातभट्टीधारकां मध्ये खळबळ उडाली आहे .
शिवपुर कन्हाळा शिवारात नाल्या जवळ सार्वजनिक जागी
आज दिनांक २ ऑक्टोबर शुक्रवार रोजी ६.२० वाजेच्या
जाकीर हुसेन गवळी रा.कन्हाळा हा गावठी हातभट्टीची दारू गाळण्याचे गूळ मोह नवसागर मिश्रित द्रव्य कच्चे रसायन ५ ड्रम त्यात ९०० लिटर रसायण व गावठी हातभट्टीची २० लिटर तयार दारू अंदाजे किंमत ३० हजार ८००/- रुपये किमतीचे मालासह मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध प्रोव्हीजन कायदा अन्वये कलम ६५ फ, ब, क, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,सपोनि रुपाली चव्हाण,पोहेकाँ विठ्ठल फुसे,पोह प्रवीण पाटील, रियाज काझी, होमगार्ड अमोल जयकर,विनोद सपकाळे,जगदीश पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *