श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात एमएचटी-सीईटी ऑनलाइन परीक्षांना सुरुवात ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
महाराष्ट्र शासनाच्या अभियांत्रिकी औषधनिर्माण शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एमएचटी-सीईटी ऑनलाइन परीक्षांना गुरुवार पासून सुरुवात झाली. भुसावळ शहरात श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये परीक्षा होत असून संपूर्ण परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या सर्व निकष पाळले जात आहे. तालुक्यात एकच केंद्र असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची बॅचेस तयार करण्यात आल्या असून दिवसभरात सकाळी ९ ते १२ व दुपारी अडीच ते साडेपाच हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सोशल डिस्टन्स पाळत योग्य अंतरावर उभे करून त्यांचे थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटरने तपासणी केल्यानंतर सॅनीटायझरने हात स्वच्छ केले जात आहे. मास्कचा वापर देखील बंधनकारक केला आहे. परीक्षेशी संबंधित संगणक विभागातील कर्मचारी देखील सुरक्षा यंत्रणांचा वापर करीत आहेत.
केंद्रातसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जात आहे. परीक्षा झाल्यानंतर रोज सायंकाळी संपूर्ण क्षेत्रात त्यांनी सॅनीटायझेशन करण्यात येत आहे. दक्षता म्हणून जनरेटरची व्यवस्था केली आहे.
महाराष्ट्रभरात सदर परीक्षा १ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. प्रथम पीसीबी नंतर पीसीएम ग्रुपची परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे योग्य नियोजनाबद्दल व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची योग्य दक्षता घेतल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने एमएचटी सीईटी परीक्षासाठी प्रवेश होणारे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर यावे पालकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी महाविद्यालयातर्फे संपूर्णपणे सुरक्षित वातावरण निर्माण केले गेलेले आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह यांनी सांगितले आहे.
परीक्षेच्या नियोजनासाठी डॉ.राहुल बारजिभे, प्रा.आय.डी. पॉल व प्राध्यापक वर्ग परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *