भुसावळ(प्रतिनिधी )-
तालुक्यातील शिवपुर कन्हाळा येथे रविवार ३० रोजी १.३० वाजेच्या सुमारास तालुका पोलिसांनी धाड टाकून गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त केला असून सुमारे गावठी हातभट्टीची ३० लिटर तयार दारू व
४ ड्रम ८०० लिटर दारू अंदाजे ३२हजार १०० रुपये किंमतीचे
कच्चे रसायनासह उद्ध्वस्त केली असून एका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
शिवपूर कन्हाळा गावांत रविवार ३० रोजी १.३० वाजेच्या सुमारास सार्वजनिक जागी संशयीत आरोपी सलीम हसन गवळी रा.कन्हाळा हा मानवी आरोग्यास अपायकारक गावठी हातभट्टीची दारू गाळण्याचे गूळ मोह नवसागर मिश्रित द्रव्य कच्चे रसायन ४ ड्रम ८०० लिटर व गावठी हातभट्टीची ३० लिटर तयार दारू अंदाजे किंमत ३२ हजार १०० रुपये मालासह मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध प्रोव्ही कायदा भादवि कलम ३२८ मु प्रोव्ही कायदा कलम ६५ फ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ही कारवाई उप विभागीय पो अधिकारी गजानन राठोड , यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,सपोनी अमोल पवार ,पोहेकाँ विठ्ठल फुसे, जगदीश भोई ,शिवाजी खंडारे, यांनी केली आहे .



