चक्क नवरदेव नवरीने केले वरातीतील लोकांना सॅनेटायझर ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथिल भुसावळचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधीकारी तसेच माजी नगर सेवक मोहन निकम यांचा मुलगा विवेक व कुर्ला येथिल आकांक्षाचा विवाह रविवार ३० रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शहरातील एका नामांकीत हॉटेल मध्ये अत्यंत साध्या पध्दतीने पार पडला.
यावेळी लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांवर नवरदेव विवेक व नववधू आकांक्षा यांनी स्वता: सॅनेटायझर फवारणी करून सॅनेटायझ केल्यानंतरच सभा मंडपात (हॉल) मध्ये प्रवेश देण्यात आला . गेल्या कित्येक दिवसांपासून शहरात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे हे पाहता शासनांच्या नियम व अटींचे पालन करून लग्न सोहळा थाटात पार पडला .प्रसंगी सर्वांनी नियमांचे पालन केल्यास शहरासह परिसरातील कोरोनाचे रुग्नांचे प्रमाण शहरात लवकरच
कमी होईल असा दृढ व ठाम विश्वास वर पिता मोहन निकम यांचेसह नववर व वधु यांनी व्यक्त केला . यावेळी नवदाम्पत्यास उपस्तिथ मंडळीनी शुभाशीर्वाद दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *