सुनसगाव –
संततधार पावसामुळे भुसावळ तालुक्यातील वाघुर धरणाचे दोन दरवाजे शनिवार रोजी रात्री साडे नऊ वाजेदरम्यान पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे .
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास व पाण्याच्या पातळीत वाढ होत राहिल्यास आणखी काही दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती वाघुर धरणाच्या प्रशासनाने कळवीले असून वाघुर नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे .



